महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

झोपडीवर वीज कोसळून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

रक्षणासाठी घेतलेला आसराच जीवावर बेतल्याची घटना नागपूरच्या रामटेक तालुक्यातील चोरखुमारीमध्ये घडली. पावसापासून बचावासाठी पाच जणांनी शेतातील झोपडीचा आसारा घेतला. मात्र, झोपडीवरच वीज पडल्याने तीघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले.

By

Published : Jul 8, 2021, 9:11 AM IST

नागपूर
नागपूर

नागपूर -वीज कोसळून गुरख्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जखमी झाले. रामटेक तालुक्यातील चोरखुमारी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. योगेश अशोक कोकण, मधुकर सावजी पंधराम, दिलीप मंगल लांजेवार ही मृतकाची नावे आहेत. तर दोन जखमींवर रामटेक येथील रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

सध्या सर्वत्र शेतात पेरणीची कामे सुरू आहे. गावालगत हरीश सरोते यांचे शेत असून त्यांनी पोलीस पाटील योगेश कोकण यांचा ट्रॅक्टर शेतीकामासाठी बोलवला होता. तर दिलीप लांजेवार हा शेतात मजूर म्हणून कामाला होता. यावेळी मधुकर पंधराम हे 12 वर्षाच्या नातवाला घेऊन जनावरांना शेतात चराई करत होते. यावेळी पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांनी शेतातील झोपडीत आसरा घेतला. मात्र, रक्षणासाठी घेतलेला आसराच जीवावर बेतला. झोपडीवर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर दोघं जखमी झाले.

पोलीस पाटील योगेश अशोक कोकण, जनावरांना चराई करत असलेले मधुकर सावजी पंधराम, मजूर दिलीप मंगल लांजेवार या तिघांचा अंगावर विज पडताच जागीच मृत्यू झाला. हरिसिह धोंडबा सोरते, नेहाला रामशिंग कुंभर अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतदेहांवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे चोरखुमारी गावात शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details