महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'थॉमस कुक इंडिया'ला ग्राहक मंच न्यायालयाचा दणका! दंडासहित तक्रारदारालाही पैसे देण्याचे दिले आदेश - consumer forum court nagpur

थॉमस कुक इंडिया लिमिटेड कंपनीला ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी एक लाख दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टूर ऑपरेटरच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागपूर येथील रहिवासी सिल्वानो लुकास रॉड्रिग्ज यांना त्रास सहन करावा लागला होता.

Thomas Cook India Limited
थॉमस कुक इंडिया लिमिटेड

By

Published : Jan 24, 2020, 1:38 PM IST

नागपूर - जगप्रसिद्ध थॉमस कुक इंडिया लिमिटेड कंपनीला ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी एक लाख दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टूर ऑपरेटरच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागपूर येथील रहिवासी सिल्वानो लुकास रॉड्रिग्ज यांना त्रास सहन करावा लागला होता. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना ग्राहक मंचाने थॉमस कुकला हा आदेश दिला आहे. या दंडाशिवाय कंपनीने सिल्वानो यांनी टूरसाठी भरलेली पाच लाख तेवीस हजार रुपयांची रक्कम 12 टक्के व्याजासहित परत करण्याचे आदेशही दिले आहेत.

थॉमस कुक इंडिया विरूद्ध सिल्वानो रॉड्रिग्ज प्रकरण... थॉमस कुक इंडियाला ग्राहक मंच न्यायालयाचा दणका !

हेही वाचा... केंद्रीय अर्थसंकल्प : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे!

काय आहे प्रकरण ?

सिल्वानो यांना आपल्या कुटुंबीयांसोबत युरोप दौरा करायचा होता. त्याकरिता त्यांनी सिद्ध थॉमस कुक कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयात जाऊन तिकीट खरेदी केले आणि त्यावेळी कंपनीला 5 लाख 23 हजारांची रक्कम दिली. त्यांचा प्रवास हा 27 मे ते 14 जूनपर्यंत निर्धारीत होता. हे सर्व करताना थॉमस कुक कंपनीने त्यांना व्हीजा मिळवून देण्याचे वचन दिले होते.मात्र, संपूर्ण कुटुंब युरोप टूरचे स्वप्न रंगवत असताना अचानक त्यांच्या उत्साहावर विरजण पडले

नॉर्वेच्या दूतावासाने त्यांचा व्हिसा अर्ज नाकारला. टूर ऑपरेटरने योग्य कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्यांचा व्हिसा नाकारण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिल्वानो यांनी स्वतः दिल्ली जात वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी आपला युरोप दौरा रद्द केला.

या संपूर्ण घटनाक्रमामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. टूरच रद्द झाल्यानंतर सिल्वानो यांनी थॉमस कुक कंपनीकडे तिकीट आणि व्हिसा करिता भरलेले 5 लाख 23 हजारांची रक्कम परत मागितली. मात्र, कंपनीने टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी थेट ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. तब्बल 7 वर्ष हा खटला सुरू होता. नुकतेच या प्रकरणाचा निकाल लागला. त्यात ग्राहक न्यायालयाने थॉमस कुक कंपनीवर एक लाख दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. शिवाय कंपनीने सिल्वानो यांनी टूर करिता भरलेली पाच लाख तेवीस हजार रुपये रक्कम 12 टक्के व्याजाने परत करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा... नरेंद्र मोदींनी घेतली ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट

सिल्वानो रॉड्रिग्ज यांनी केले निर्णयाचे स्वागत ...

ग्राहक न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला हा खूपच चांगला निर्णय आहे. मला केवळ माझ्या रकमेचा परतावा हवा होता. त्याशिवाय जो खर्च झाला त्याचा परतावा हवा होता. जो पाच लाख तेवीस हजारांच्या आसपास आहे, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details