नागपूर देशाच्या काही भागात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला Shrikrishna Janmashtami festival सुरूवात झाली आहे. नागपूरात देखील गोकुळाष्टमीचा उत्साह बघायला मिळत आहे. गुरुवारी घरोघरी श्रीकृष्णाचे आगमन होणार आहे, त्यामुळे बाजारात रौनक आली आहे. परंतु यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवावर महागाईचे सावट असल्याने भक्तांच्या खिशावर ताण वाढला आहे. सर्वात मुख्य बाब म्हणजे मूर्त्यांच्या किमतीत २० ते २५ टक्यांची वाढ Price Of Krishna Idols Has Increased झाल्याचे दिसून येत आहे. या शिवाय सजावटीचे साहित्य देखील महाग झाल्याने भक्तांना हात आखडता घ्यावा लागतं असला तरी उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पार श्रद्धे पुढे महागाईचा फारसा प्रभाव पडत नाहीगेल्या दोन दिवसांपासून श्रीकृष्ण भक्त नागपूरच्या Shri Krishna Bhakta Nagpur चितार ओळीत कान्हाची मूर्ती घरी नेण्याकरिता गर्दी करू लागले आहेत. मात्र, मूर्त्यांचे वाढलेले दर बघून भक्तांना बजेटचा विचार करावा लागतो आहे. तरी देखील अपार श्रद्धे पुढे महागाईचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे मत अनेक भक्तांनी व्यक्त केला आहे