नागपूर -आज केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ चा समावेश केला आहे. नागपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक परिवहनाचे साधन तसेच सध्याच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज - १ ची प्रगती बघता हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबत नाशिक येथील मेट्रो नियो प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज केंद्रीय वित्त मंत्री श्रीमंती निरमला सीतारामन यांनी लोकसभेच्या पटलावर या दोन्ही शहराच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज - २ मध्ये ५९७६ कोटी व नाशिक मेट्रो नियो करिता २०९२ कोटी रुपयाची घोषणा केली आहे.
३२ मेट्रो स्टेशनचा समावेश-
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज - २ हा ४३.८ कि.मी लांबीचा असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे की, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज २ ला ८ जानेवारी २०१९ व नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाला २८ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती.
असा असेल नागपूर मेट्रो फेज - २
- आटोमोटिव्ह चौक ते कन्हान-