नागपूर: नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाला तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यातच काँग्रेस, उमेदवार बदलवत असून अपक्ष असलेल्या मंगेश देशमुखांचे नाव समोर येत असल्याची चर्चा आहे. पण असे जर होणार असेल तर काँग्रेससारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे हे दुर्दैवच म्हणण्याची वेळ आहे. कारण मोठा काळ भाजप आणि संघात निष्ठावंत असलेले छोटू भोयर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणे, त्यानंतर त्यांना उमेदवारी देणे. पण एन वेळी अपक्ष असलेल्या मंगेश देशमुख चे नाव घेणे धक्कादायक आहे असे आमदार दटके यांनी म्हणले आहे
भाजप नगरसेवकच 'त्या' उमेदवाराचा सूचक
धक्कादायक म्हणजे विधानपरिषदेत अपक्ष असलेला उमेदवार मंगेश देशमुख यांनी अपक्ष म्हणून नामांकन भरले असले तरी त्यांच्या अर्जात तीन पक्षाचे नगरसेवक हे सूचक आहेत. भाजपसह बीएसपी आणि काँग्रेसचे सूचक असणारा तो उमेदवार आहे. त्यामुळे जर भाजपच्या नगरसेवकांचे नाव ज्याच्या सूचकमध्ये तो उमेदवार कसा असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. छोटू भोयर हे उमेदवार नाहीत तर मग मंगेश देशमुख हे काँगेसला उमेदवार म्हणून चालतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चर्चेशी आमचे काही देणे घेणे नाही. आम्ही कुठली तक्रार ही करणार नाही. असे म्हणत त्यांनी भोयर यांना टोला लगावला.