नागपूर - केंद्राचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी आर्थिक निधीची भरघोस तरतूद करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या बजेटमधून राज्यातील महामेट्रो कंपनीला भरगोस निधी मिळाला आहे. मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महामेट्रो या कंपनी अंतर्गत कामे केली जाणार आहेत. यामुळे महामेट्रोला डबल फायदा झाला आहे. यामुळे बजेटमधून महामेट्रोला बुस्टअप मिळणार असल्याचे मत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे यश वर्मा यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या बजेटमधून महामेट्रोला मिळणार 'बुस्टअप' - नागपूर लेटेस्ट अपडेट अर्थसंकल्प
अर्थसंकल्पामध्ये नागपूर मेट्रोच्या फेज 2 साठी 5 हजार 976 कोटी आणि नाशिकसाठी 2 हजार 092 कोटी असे एकूण 8 हजार 068 कोटी हे एकाच कंपनीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे महामेट्रोला व मेट्रोच्या कामाला चांगला बुस्ट अप मिळणार आहे.
यंदाच्या बजेटमधून महामेट्रोला मिळणार 'बुस्टअप'
फेज २ ला मिळणार गती -
मेट्रोचा फेज 2 हा 2023 पर्यंत पूर्ण होणार होता. आताच्या अर्थसकल्पात निधीची तरतूद झाल्याने या कामाला वेग येणार आहे. यात इकॉनॉमिकली पाहता या कंपनीशी जोडून असणारे व्हेंडर हे सर्व विदर्भातील असणार आहेत. या सगळ्यांची वर्षाकाठी उलाढाल वाढणार म्हणजे नफा वाढणार आहे. टॅक्स ऑडिट लिमिट पाच कोटी वरून 10 कोटी करण्यात आली आहे. यात यांचे व्यवहार पाहात त्यांना टॅक्स ऑडिट करावे लागणार नसल्याने त्याचाही चांगला फायदा या निमित्याने होणार असल्याचेही वर्मा म्हणाल.
Last Updated : Feb 2, 2021, 1:15 AM IST