नागपूर - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसून येत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रभावीपणे लसीकरण मोहिमेची अमलबाजवणी केली आहे. यात जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत असताना अनेक मोठ्या सेंटरवर लसींचा साठा संपला आहे. शासकीय रुग्णालयात मोजकेच डोस शिल्लक असून मेयो हॉस्पिटलमध्ये साठा संपला असल्याचे पुढे येत आहे.
नागपूर जिल्ह्यात 16 जानेवरीपासून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात 1 लाख 14 हजार डोस आले होते. यात नागपूर जिल्ह्याला 40 हजार डोस मिळाले होते. यात 34 केंद्रावर आरोग्य सेवेतील लोकांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 2 फेब्रुवारीला पोलीस, स्वच्छता विभाग, यासह फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण देण्यात आले. 1 फेब्रुवारीपासून 65 वर्षावरील आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्यांचा यात समावेश करून लस द्यायला सुरुवात झाली. यात 1 एप्रिल पासून 45 वर्ष पेक्षा सर्वच नागरीकांना लस देण्यात आली असल्याने लसीची मागणी वाढली आहे.
जिल्ह्याला 4 लाख डोसेज मिळाले
जिल्ह्यात आतापर्यंत कोव्हिशिल्डचे 4 लाख 5 हजार 800 डोस मिळाले होते. तेच 22 हजार 800 डोसेस हे कोवॅक्सिनचे मिळाले होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली असून यात अनेक केंद्रावर लसी संपल्याने लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. यात सध्या 135 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
हेही वाचा -'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
जिल्ह्यात 8 एप्रिलपर्यंत किती लोकांना मिळाली लस