नागपूर - समीर खान यांच्या झालेल्या कारवाईनंतर एनसीबीला तंबाखू आणि गांजा यातील फरक कळत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. पण मलिक अथवा समीर खान यांनी एनसीबीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला तथ्य आहे असे म्हणता येणार नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते नागपुरात रवी भवन येथे माध्यमांशी बोलत होते.
नवाब मालिकांच्या आरोपात तथ्य आहे असे वाटत नाही प्रकाश आंबेडकर हे नागपूरात रविवारी पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी केंद्रीय एजन्सीकडून सुरू असलेल्या कारवाईवर बोलत होते. यामुळे एजन्सीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाचा हाताचे बाहुले बनू नये चौकटीत राहून कारवाई करावी असेही भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.
राजकीय पक्षाचे बाहुले बनू नये
केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर बंधन येणे आवश्यक आहे. कारवाई केल्यानंतर त्या कारवाईची माहिती सामान्य लोकांकडे पोहचली पाहिजे. त्यानंतर लोकांना ठरवू द्या त्या नेत्यांसोबत जायचे की नाही. अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली पाहिजे. गुन्हा दाखल केल्यानंतर 90 किंवा 190 दिवसात दोषारोप पत्र दाखल केले पाहिजे. न्यायालयात ते प्रकरण चालले पाहिजे. पण अधिकारी नियमांचे पालन करणार नाही. लूटमार फसवणुकीचे गुन्हे लावून कारवाई झाली पाहिजे. त्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली सूट ही चुकीची आहे. अधिकारी वर्गाने त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून काम केले पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षाचे बाहुले बनून काम करू नये. पण दुर्दैवाने यापूर्वी झालेल्या अनेक धाडी पडल्या आहेत. त्या कारवाईना दोन तीन वर्षे लोटली आहे. प्रकरण चुकीचे होते म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा आहे असा साधा अर्ज केला कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याने केला नाही. त्यामुळे कोणीही धुतल्या तांदळासारखे आहे. कोण डागाळले आहे हे कळत नाही असा टोला लगावत राजकीय नेते आणि कारवाई करणाऱ्या एजन्सीचे अधिकारी या दोघांवर जोरदार टीका केली.
आयकर विभागाची कारवाई
आयकर विभागाने केलेल्या कारवाईत अजित पवार यांच्या निकटवर्तीयांसह अनेक बड्या नेत्यांवर कारवाई झाली. त्या धाडीत वसुलीसाठी सॉफ्टवेअर बनवल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण असे असल्यास त्या संदर्भात पुरावे सादर करायला पाहिजे. केवळ बोलून राजकीय वातावरण खळबळजनक बनवण्यासाठी हे वक्तव्य केले जाते. त्यामुळे लोकही त्याच्याकडे करमणूक म्हणून बघतात आणि सोडून देतात. तेही गांभीऱ्याने घेत नाही असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
निवडणुकीपूर्वी असे बुजगावणे येतात
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पक्षवाढीचे काम सुरू आहे. त्यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, असे बुजगावणे अनेक येतात. आणि निवडणुकीअगोदर विरघळून जातात. मी त्यांना काही गांभिर्याने घेत नाही. पण महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवणार नाही. कारण राजकीय पक्षातील अधिकारी पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसाठी केलेल्या कामाची मतदानाच्या स्वरूपात मिळालेली कामाची पावती सोडायला तयार नाहीत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढले पाहिजे हा दबाव मोठा असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचितांचे निर्णय ते घेतील
सध्या मी प्रकृती ठीक नसल्याने सक्रियपणे बाहेर पडलो नाही. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातील निर्णय रेखाताई ठाकूर आढावा घेऊन घेतील. तसेच कोणत्या पक्षासोबत जायचा याचा निर्णय त्या घेतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. गरज पडल्यास एखादं दोन ठिकाणी प्रचाराला जाईल असेही ते म्हणालेत.
हेही वाचा -सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ घालण्याची या सरकारला सवयच जडली आहे- गोपीचंद पडळकर