नागपूर- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाने 20 दिवसांपूर्वी मृत साठा गाठला होता. त्यामुळे नागपुरकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले होते. मात्र जोरदार पावसामुळे व चौराई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तोतलाडोह धरणात 90 टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. तोतलाडोह धरण 2013 नंतर पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
तोतलाडोह धरण भरल्याने नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले - नागपूर पाणीसंकट
तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होऊन 90 टक्क्यांवर पाणीसाठा पोहचला आहे. जलाशयात पाणीसाठा वाढल्याने नागपूर शहरावरील जलसंकट दूर झाले आहे. तोतलाडोह धरण 2013 साला नंतर पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे.
हेही वाचा - नागपूर शहराला आता महावितरण करणार वीजपुरवठा, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महापालिका शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासंबंधीचा निर्णय 15 सप्टेबर नंतर घेईल, अशी माहिती पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय झलके यांनी दिली. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या जलाशयाने तळ गाठला होता. त्यातच मान्सूननेही दडी मारल्याने मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली होती. परंतु गेल्या काही दिवसात लगतच्या मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने तेथील चौराई धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तोतलाडोहातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. तोतलाडोह जलाशयात पाणीसाठा वाढल्याने नागपूर शहरावरील जलसंकट दूर झाले आहे. तसेच पाण्याची पातळी 95 टक्क्यांवर पोहोचल्यास तोतलाडोह मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती विजय झलके यांनी दिली.