नागपुर - महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाचा अंदाज घेऊन कृषी सल्ला देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हवा खाऊन जगण्याची वेळ आली आहे. वारंवार निवेदन देऊनही वर्षभरापासून फंडिंग एजन्सी असलेल्या हवामान विभागाला या जिल्हा स्तरावर कृषी विद्यापीठात कंत्राटी नेमलेले वेतानासाठी फंडच उपलब्ध झाला नाही. ( Agricultural Meteorological Center ) त्यामुळेच कृषी विषय शास्त्रज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती एका केंद्राची नसून महाराष्ट्रात 11 केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्याची अशीच अवस्था असून देशभरातील सुमारे 200 केंद्राव अशीच अवस्था वेतनाची असल्याचा आरोपही होत आहे.
हवामान विभागाकडून जिल्हा हवामान केंद्र चालवले जाते - देशभरात 27 राज्यातील 40 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना सल्ला देणाऱ्या डिस्ट्रिक्ट ऍग्रोमेट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. यात (2017)मध्ये ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या अखत्यारीत सुमारे 200 केंद्र सुरू करण्यात आले. ( Agricultural Meteorological Center In Pune ) या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून कृषी सल्ला दिला जातो. यामुळे हा सल्ला शेतकऱ्यांना त्याचे पिकाचा नियोजनासह पीक काढणी, बाजारात विक्रीपर्यंत नेण्यासाठी महत्वाचा ठरतो. यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यालयाच्या मदतीने हवामान विभागाकडून जिल्हा हवामान केंद्र चालवले जाते.
महाराष्ट्रात 11 केंद्र आहे कार्यान्वित -देशसभरात 500 पेक्षा अधिक केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. पण केवळ 200 केंद्र सुरू झाले. यात प्रत्येक केंद्रावर दोन कर्मचारी या पद्धतीने 400 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. पण नियमित वर्षभर वेतन दिल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून म्हणजे एप्रिल 2021 पासून अद्याप 13 महिने लोटून वेतन दिले गेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना आम्ही कृषी सल्ला द्यायचा कसा असा प्रश्न उपस्थित आहे.