नागपूर - न्यायालयाच्या आदेशानंतर मेडिकल कॉलेजमध्ये फायर ऑडिट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मागील काळात रुग्णालयात वाढत्या आगीच्या घटनेवरून दुर्लक्षितपण भोवणारा ठरला. यामुळेच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने यासंदर्भात मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेले नागपूर मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी शासकीय रुगणालयाचे ऑडिट 30 जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भविष्यातील धोका टाळण्यासाठी फायर ऑडीट गरजेचे
राज्यात अनेक रुग्णालयात मध्यंतरीच्या काळात आगीच्या घटनांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागला. बऱ्याच घटना या शॉर्ट-सर्किटमुळे झाल्याचे असल्यामुळे, फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब न्यायालयाच्या समोर आली. यामुळे मेडिकल कॉलेज सारख्या ठिकाणी हजारो रुग्ण, नातेवाईक दवाखान्यात रोज ये-जा करत असतांना अश्या दुर्दैवी घटना घडू नये. शिवाय भविष्यातील धोका टाळण्यासाठी फायर ऑडीट करून घेणे गरजेचे आहे. या आदेशानंतर दुरुस्ती करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. यात फायर फायटर व्यवस्था आणि इलेक्ट्रीकल बाबी तपासण्याचे काम केले जात आहे.
काय तपासले जाणार?
यामध्ये रूग्णालयात जुन्या झालेल्या इलेक्ट्रीक लाईन, किंवा संभावता धोकादायक ठरू शकेल असे ठिकाण शोधून दुरुस्ती केली जाईल. यासोबत बऱ्याच घटना या आयसीयू, किंवा एसी तसेच बरेच इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, मशिनरी खराब होऊन शॉर्टसर्किट होऊन या घटना घडतात. यामुळे सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत.