नागपूर - नागपूरात कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुलाच्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम स्थगित केल्याचे नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी सांगितले. सामाजिक भान जपत कोरोनाच्या प्रकोप वाढत असतांना एक सामाजिक संदेश देण्यात आला. यासह नागरिकांनीही लग्नात गर्दी न करता काळजी घेण्याचे आवाहन त्यानी केले.
त्रिसूत्रीचे पालन करा.. कोरोनाचा संसर्ग टाळा-
नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. विवाह सोहळ्यात ५० च्या वर लोकांनी एकत्र येऊ नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः ही कोरोना विरुद्धच्या लढाईवर बारकाईने नजर ठेवून आहे. वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचनाला देण्यात येत असल्याचे राऊत म्हणाले. कोरोनाच्या त्रीसूत्रीचे म्हणजेच मास्क लावणे, सॅनिटायझरने हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, इत्यादी बाबींचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले.