नागपूर: एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना आता पोलीस भरती प्रक्रियेत धारण प्रमाणपत्राच्या आधारे अधिक गुण ( More points based on holding certificate ) देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार ( Sports Minister Sunil Kedar ) यांनी दिली आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यामुळे एनसीसी धारक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यात अ, ब आणि क या तीन वेगवेगळी प्रमाणापत्र धारकांना त्यांच्या श्रेणीनुसार दोन, तीन आणि पाच टक्के अधिकचे गुण एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ( NCC students will get more marks ) आहेत. यामुळे आता एनसीसीच्या हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
Good news for NCC students : एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पोलीस भरतीत मिळणार अधिक गुण - पोलीस भरती
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ( NCC students ) पोलीस भरतीत ए,बी,सी या प्रमाणपत्राच्या आधारे अधिक गुण अधिक गुण दिले जाणार आहेत. याबाबतची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. त्यामुळे आता एनसीसीच्या विद्यार्थ्यांना फायदा ( Benefit students of NCC ) होणार आहे.
नागपुरात 27 मार्चला ऐरो मॉडेलिंग शोचं ( Aero modeling show ) आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा ऐरो मॉडेलिंग शो महत्वाचा असणार असून तरुणांमध्ये नवं चैतन्य निर्माण होणार आहे. एनसीसीच्या माध्यमातून या शोचे आयोजन होणार आहे.नागपुरात बऱ्याच वर्षानंतर हा शो असणार आहे. कोरोनाच्या काळात जे विद्यार्थी घरी होते, त्यांच्यात या माध्यमातून उत्साह संचारेल, असेही क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले.