नागपूर - कोरोनावरील लसीची आस सर्वांनाच लागली आहे. त्यादृष्टीने विविध प्रयोगशाळेत लसीच्या संशोधनाचे काम सुरू आहेत. अशावेळी सर्वसामान्य व्यक्तीकडून फ्लू ची लस घेतल्यामुळे कोरोनाची भीती कमी असते. असा समज आहे. मात्र फ्लू ची लस ही कोरोनावर प्रभावी नाही. असे मत नागपूरातील तज्ञ डॉक्टर वाय. एस. देशपांडे यांचे आहे. शिवाय कोरोनाच्या लसीकरणाची गरज काही ठराविक घटकांनाच आहे. त्यामुळे फ्लु लस आणि कोरोना लस यात फरक आहे. अशी स्पष्टोक्तीही तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
त्याचबरोबर देशात सध्या कोरोना लसीकरणाची तयारी सुरू आहे. अनेक नागरिक लसीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र कोरोना लसीकरणाची खरी गरज आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि ज्यांची रोगप्रकारक शक्ती अत्यंत कमी आहे, अशा व्यक्तींनाच आहे. त्यामुळे सरसकट सर्वांनाच लसीकरण गरजेचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
भीतीपोटी नागरिकही सावध-
शिवाय बाजारपेठेत फ्लूच्या लसीची विक्री हे नेहमी प्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनाच्या भीती पोटी अनेक जण आपल्या प्रकृतीत थोडे जरी बदल वाटू लागले तर डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोरोना लसी बाबतही डॉक्टरांकडून माहीती घेतांना पहायला मिळत आहे. मात्र फ्लू आणि कोरोना ह्या दोन्ही बाबी पूर्णतः भिन्न असल्याची माहीती तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.