नागपूर -नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात विदर्भातील सर्वात पहिले बालस्नेही आणि महिला अधिकारी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आज या दोन्ही कक्षाचे उदघाटन पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झलके यांच्या हस्ते करण्यात आले. वि सेवन फाउंडेशनच्या सहकार्याने बालस्नेही कक्षाला लहान मुलांचा विरंगुळा होईल, यादृष्टीने सजवण्यात आले आहे
विदर्भातील पहिला बालस्नेही कक्ष सीताबर्डी पोलीस ठाण्यात सुरू, मुलांना तणावपूर्ण वातावरणापासून दूर ठेवण्यासाठी उपक्रम
नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात विदर्भातील सर्वात पहिले बालस्नेही आणि महिला अधिकारी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आज या दोन्ही कक्षाचे उदघाटन पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झलके यांच्या हस्ते करण्यात आले.
सीताबर्डी पोलीस स्टेशन हे नागपूर शहरातील सर्वात जुने व मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव पोलीस स्टेशन आहे. सध्याची सीताबर्डी पोलीस स्टेशनची वाटचाल "स्मार्ट पोलीस स्टेशन" च्या दिशेने होत आहे. या अंतर्गत पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या संकल्पनेतुन सीताबर्डी पोलीस स्टेशनकडून एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमान्वये पोलीस स्टेशनच्या आवारात स्वतंत्र खोलीमध्ये लहान मुलांना आवडेल, असा बालस्नेही कक्ष तयार करण्यात आलेला आहे. खास बालकांसाठी अशाप्रकारची सुविधा असलेले हा विदर्भातील पहिलाच उपक्रम आहे.