महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mohan Bhagwat : पशुपालन शास्त्राच्या मदतीने देशाचा जीडीपी वाढवता येईल- मोहन भागवत - सरसंघचालक मोहन भागवत

आधुनिक विज्ञानाचे काही दुष्परिणाम ( side effects of science ) आहेत परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेले हजारो वर्षाच्या ज्ञानाचे कधीही दुष्परिणाम होत नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh ) यांनी केले.

Mohan Bhagwat
मोहन भागवत

By

Published : Jun 20, 2022, 9:41 PM IST

नागपूर -आधुनिक विज्ञानाचे काही दुष्परिणाम ( side effects of science ) आहेत परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेले हजारो वर्षाच्या ज्ञानाचे कधीही दुष्परिणाम होत नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh ) यांनी केले. राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्था ( National Institute of Veterinary Sciences ) आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ( Maharashtra University of Animal and Fisheries Sciences ) यांच्या द्वारे आयोजित दोन दिवसीय अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला देखील उपस्थित होते.



जैविक शेती हे विज्ञान सिद्ध - काही वर्षांपूर्वी जैविक शेती करणे म्हणजे मागासलेपणाचे मानले जायचे मात्र आता जैविक शेती हे विज्ञान सिद्ध गोष्ट असल्याचे डॉक्टर मोहन भागवत यावेळी म्हणाले.शेती आणि पशुपालन पद्धतीत आपण भारतीय खूप समोर असल्याचे डॉक्टर भागवत म्हणाले. यामुळे या दोन दिवसीय सेमिनार मध्ये या पशुपालन शास्त्राला कसे समोर घेऊन ज्यायचे आणि देशाचा जीडीपी कसा वाढवण्यात येईल यावर चर्चा करावी असंही मोहन भागवत म्हणाले.

भागवत मानद फेलोशिप - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'माफसू' मधून पशुविज्ञान शाखेत पदवी घेतली आहे. या कार्यक्रमा दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रीय पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेतर्फे मानद फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले.

सरसंघचालक मोहन भागवत

गाय स्वावलंबी -गोमूत्र आणि शेण यामुळेच गाय स्वावलंबी असून दूध हे अतिरिक्त नफा असल्याचे केंद्रीय दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी म्हणाले. गायी संबंधात अधिक संशोधन करण्याची गरज असून त्यासंबंधी या सेमिनार मध्ये चर्चा करावी अशी सूचना केंद्रीय मंत्री रुपाला यांनी दिली. राष्ट्रीय पशु विज्ञान संस्था व माफसू यांच्या तर्फे २०आणि २१ जून रोजी बारावा वार्षिक दीक्षांत समारोह आणि वैज्ञानिकांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉक्टर मोहन भागवत आणि पुरुषोत्तम रुपाला उपस्थित होते.

हेही वाचा - Sangli Family Suicide : सांगली हादरलं ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details