महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा हा राष्ट्रवादी विचारांचा - संघ विचारक सुधीर पाठक

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं म्हणत त्याला समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे म्हटले आहे. त्यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा हा राष्ट्रवादी विचारांचा असल्याची प्रतिक्रिया संघ विचारक सुधीर पाठक यांनी दिली.

Sudhir Pathak
संघ विचारक सुधीर पाठक

By

Published : Sep 5, 2021, 10:04 AM IST

नागपूर - गीतकार जावेद अख्तर यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम समाजातील एका गटाला विरोध केला. तसेच त्यांनी तालिबान्यांची आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची तुलना केली. याविषयावर तरुण भारतचे सेवानिवृत्त संपादक आणि संघ विचारक सुधीर पाठक यांनी आपले मत मांडले. तालिबानसोबत आरएसएसची तुलना करणे हे चूकीचे. मात्र, जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा पाहिला तर राष्ट्रावादी विचारांचा असून त्याला अधिक महत्त्व देणे गरजेचे असल्याचे पाठक म्हणाले.

जावेद अख्तर यांच्या विधानावर संघ विचारक सुधीर पाठक यांची प्रतिक्रिया

तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम लोकांवर जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. हे फार साधे वक्तव्य झाले असते. याला जास्त बातमी मूल्य राहिले नसते. यामुळे त्यांनी हिंदू संघटनांची तुलना थेट तालिबान सोबत केली. त्यांच्या दृष्टीने भारतातील तालिबानी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तालिबानी हिंदू गट. ते लेखक आहे त्यांनी माहीत होते नेमके काय वक्तव्य केल्याने लक्ष वेधल्या जाऊ शकेल. पण जावेद अख्तर यांच्या मूळ वक्तव्यातील गाभा पाहता, भारतातील काही मुसलमानांचा विचार हा तालिबानचे समर्थन नाही करावे, असा आहे. जावेद भाई यांचा आदर्श ठेवून भारतातील मुस्लिम समाजातील विद्वान, संशोधकांनी हा विचार पुढे नेत तो अधिक प्रबळ केला पाहिजे, असेही संघ विचारक सुधीर पाठक यांनी म्हटलं.

जावेद अख्तर यांनी हिंदू संघटनांची तालिबान सोबत केलेली तुलना ही चुकीची आहे. पण त्याचे मूळ वक्तव्य जे आहे. ते झाकल्या जाऊ नये. त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. जावेद अख्तर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी मुसलमान कसा असतो हे प्रतिक समोर येते, असे ते म्हणाले. तसेच यावेळी जावेद अख्तर राष्ट्रवादी कसे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी पाठक यांनी जावेद अख्तर यांच्या 2016 मध्ये राज्य सभेत केलेल्या भाषणाचा दाखला दिला. 'कोण म्हणाले की मला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही. मी भारत माता की जय म्हणू शकतो', असे जावेद अख्तर राज्यसभेत म्हणाले होते. असे बोलण्याचे स्पिरिट हे राष्ट्रवादी स्पिरिट आहे, असे पाठक यांनी म्हटलं.

काय म्हणाले जावेद अख्तर?

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानवर भाष्य केले होते. तालिबानी रानटी आणि मध्ययुगीन मानसिकता असलेली लोक आहेत, असे ते म्हणाले. तसेच अख्तर यांनी तालिबानची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत केली होती. तालिबानचा जो उद्देश आहे. तोच आरएसएस, वीएचपी आणि बजरंग दलासारख्या संघटनांचा आहे. भारतीय संविधान त्यांच्या मार्गात अढथळा निर्माण करत आहे. मात्र, संधी भेटली तर ती सीमाही हे पार करतील, असे जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा -नसरुद्दीन शाहांचे खडेबोल, तालिबान समर्थकांना चपराक, सोशल मीडियावर पोस्ट केला VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details