महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Reaction of Minister Yashomati Thakur :  विरोधी पक्षाचे फुटलेले मत आम्हाला मिळालेले असावे : यशोमती ठाकूर - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश (Failure of Mahavikas Aghadi) आले. परंतु, मतांची गोळाबेरीज करताना काॅंग्रेसला दोन मते अधिक मिळाले. काॅंग्रेसने ही मते अधिकची घेतली, असे प्रफुल पटेल (NCP leader Praful Patel) यांच्या विधानाशी असहमती दर्शवत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी असे काही झाले नसावे. ते मत ते विरोधी पक्षाचे फुटून आम्हाला मिळालेले असावे, (Opposition Split And We Got Votes) असे मत त्यांनी मांडले. आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच कोटा ठरवला होता. त्यामुळे अधिकची मते घेण्याचा काहीही संबंध नव्हता.

Women and Child Development Minister Yashomati Thakur
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

By

Published : Jun 11, 2022, 10:11 PM IST

नागपूर : काँग्रेसने दोन मत अधिक घेतले, असे प्रफुल पटेल यांच्या विधानाशी असहमती दर्शवत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी असे काही झाले नसावे. आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच कोटा ठरवला होता. शेवटचे दोन मतं आमचे नक्कीच शिवसेनेला गेलेले आहे, दोन मताबद्दल सविस्तर कोणाशीही बोलणं झालेलं नाही, पण एक मत फुटले असून, ते विरोधी पक्षाचे फुटून आम्हाला मिळालेले असावे, असे महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्या नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

विधान परिषदेसाठी नवीन रणनीती आखणार : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना एकाही अपक्षांनी शब्द पाळला नाही म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात काही अपक्षांची नाराजी व्यक्त केली, अशी विचारणा केली असता तसे काही असल्यास महाविकास आघाडीतील नेते आम्ही आम्ही सगळेजण मिळून ती नाराजी मोडून काढू, अशी यशोमती ठाकूर म्हणाल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवी रणनीती घेऊन समोर जाऊ. विरोधी पक्ष विरोधी पक्षातच राहील आणि आम्ही सत्तेत राहू, असा विश्वासही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

जातीपातीचे राजकारण करू नये : आमचे येथील यात भाजपचे नेते अनिल बोंडे हे निवडून आले. आमच्या जिल्ह्याचे आहे, माजी पालकमंत्री राहिले आहेत. चांगले आहेत, सोबत मिळून काम करू, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. जातीपातीचे राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा :Yashomati Thakur : नवनीत राणांनी बेशर्मीची हद्द गाठली; यशोमती ठाकूरांची बोचरी टीका

ABOUT THE AUTHOR

...view details