नागपूर -नागपूर जिल्हा कोरोनाच्या तिसरी लाटेच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा दावा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासात रुग्ण संख्या १८ ने वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्ण संख्या एकेरी आकड्यात येत असताना आज अचानक १८ रुग्ण पुढे आले आहेत. यात १० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सीईटी परीक्षा होणार - मंत्री सामंत
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थ्याचा समावेश आहे. हे सर्व एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असून कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्येच राहात होते. दहा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजला संलग्न असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती पुढे आली आहे.
- संपर्कात आलेले सर्व विलगीकरण मध्ये -