महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Weather Updates : राज्य थंडीने गारठले; पाहा या शहरातील तापमान - IMD Forecast Cold Wave

उत्तर भारतात निर्माण झालेली थंडीची लाटेमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. परभणी ( Parbhani Weather Updates ), वाशिम ( Wahim Weather Updates ), नागपूर ( Nagpur Weather Updates ), गोंदिया ( Gondia Weather Updates ) या जिल्ह्यात पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षाही ( Temprature Down In Maharashtra ) खाली गेला आहे. येत्या चार दिवसात राज्यातील तापमान अजून घटण्याची शक्यता हवामान विभागाने ( Maharashtra Weather forecast ) वर्तवली आहे.

Maharashtra Weather
Maharashtra Weather

By

Published : Dec 20, 2021, 12:28 PM IST

Updated : Dec 20, 2021, 5:21 PM IST

नागपूर / परभणी -मागील काही दिवसांपासून परभणीच्या तापमानाचा पारा घसरत असून, त्यानुसार सोमवारी 9.5 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यासह मराठवाड्याचे तापमान घटल्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्य तापमान

परभणी जिल्ह्यात नोव्हेंबरलाच थंडी दाखल झाली होती. मात्र, यंदा ऐन दिवाळीत तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारवा नाहीसा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमानात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीचे किमान तापमान 10 अंशाच्या खाली आले आहे. त्यात आज सोमवारी तर 9.5 अंश एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात झाली आहे. या वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान असूून, यापुढे त्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

'पाणीसाठ्यांमुळे थंडीचा उद्रेक !
उत्तर भारतात निर्माण झालेली थंडीची लाट यावर्षीच्या थंडीला कारणीभूत आहे. त्याप्रमाणेच यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने तर जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला होता. ज्यामुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे. अनेक प्रकल्प 100 टक्के भरलेले आहेत. शिवाय जिल्ह्यातील डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ज्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात आले आहे. ज्यामुळे जिल्हयात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येत आहे.

विदर्भ तापमान

हेही वाचा -Parab Vs Kadam : पक्षांतर्गत खदखद वाढवणार शिवसेनेची डोकेदुखी.. कदम-परब संघर्षात पक्षाची कोंडी


'निचांकी तापमानाचा इतिहास'
मराठवाड्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद परभणीत होत असते. त्या प्रमाणेच किमान तापमानाची देखील नोंद येथेच झालेली आहे. 2 अंश इतकी निचांकी तापमानाची नोंद 29 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. याप्रमाणेच 17 जानेवारी 2003 ला 2.8 आणि 18 डिसेंबर 2014 रोजी 3.6 अंश एवढया निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पोलिस ग्रॉऊंड, वसमत रोड, जिंतूर रोड, नांदखेड रोड, गंगाखेड रोड या परिसरात सकाळी नागरिकांची लगबग दिसून येते.

शेकोटी करताना

वाशिम जिल्ह्यात पारा 11 अंशांपर्यंत घसरला
वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्याभरात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, जिल्ह्यात तापमान 11 अंशांपर्यंत खाली आल्यामुळं थंडीचा जोर वाढला आहे.त्यामुळं नागरीक मॉंर्निग वॉकला जाताना उबदार कपडे परिधान करून जात आहेत. तर अनेक ठिकाणी नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत.दरम्यान जिल्ह्यात आज थंडी वाढल्यामुळे या थंडीचा रब्बीतील पिकांना फायदा होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.

नागपुरात कमी तापमान

सकाळी नागपुरचे तापमान 7.8 अंश सेल्सियस नोंदविण्यात आलेले आहे. गेल्या २४ तासात नागपूरच्या तापमानात 5.6 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. या हंगामातील हे सर्वात कमी तापमान आहे. शुक्रवारी उपराजधानी नागपूर मध्ये ०७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर चंद्रपूर मध्ये ११.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया येथे ०८.२ अंश सेल्सिअस, गडचिरोलीत ११.६ डिग्री तापमान, वर्धा ९ अंश सेल्सिअस, अमरावती ८, यवतमाळ:- १२.५ डिग्री, अकोला:- ११.३ अंश सेल्सिअस तर बुलढाणा:- १०.५ अंश सेल्सिअस कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे

गोंदियात कमी तापमान

गोंदियात पारा 10 अंशावर

पुढील 48 तासांत उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार असल्याने 21 फेब्रुवारपर्यंत पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाईल. गोंदियात काल तापमान १२ अंश सेल्सिअल होते मात्र आज ११.५ सेल्सिअल झाले आहे. १८ डिसेंबर शनिवारला जिल्ह्याचे तापमान २७ अंश सेल्सिअसवर आले आहे. १९ डिसेंबर रविवारला १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, आज ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा -Thane District Election : अरेच्चा, शिवसेनेच्या प्रचार फेरीत बच्चे कंपनीकडून भाजपाचा जयजयकार, पाहा व्हिडिओ

Last Updated : Dec 20, 2021, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details