नागपूर - जल जीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, त्या गावातील पाच महिलांचे पथक तयार केले जाणार आहे. गावात उपलब्ध होत असलेले पाणी हे पिण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी पाच महिलांचे पथक करणार आहेत. गावातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.
गावातील पाच महिलांचे पथक तपासणार पेय जलाची गुणवत्ता, नागपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम - पाच महिलांचे पथक तपासणार पेय जलाची गुणवत्ता
जल जीवन मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, त्या गावातील पाच महिलांचे पथक तयार केले जाणार आहे. गावात उपलब्ध होत असलेले पाणी हे पिण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी पाच महिलांचे पथक करणार आहेत. गावातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.
ग्रामीण भागात दूषित, गढूळ आणि पिण्यास अपायकारक पाण्याचा पुरवठा केला जातो, अशा तक्रारींची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे की नाही, हे जनतेच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी आता जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक गावातील 5 महिलांना पाणी स्वच्छ की अशुद्ध आहे हे तपासासाठी प्रशिक्षण आणि किट देण्यात आली आहे. त्या माध्यमातून गावातील वेगवेगळ्या भागातील पाण्याचे सॅम्पल या महिला गोळा करतील. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या किटच्या मदतीने पाण्याची तपासणी करून ते पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याचा अहवाल तयार करतील. पाणी अशुद्ध आढळल्यास त्याची माहिती जिल्हा परिषदेला देतील. या योजनेत लोक सहभागीता वाढवून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या देखील रोखता येऊ शकेल असा विश्वास नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला आहे.
शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे मुख्य उद्दिष्ट -
ग्रामीण भागातील प्रत्येक घरांना 55 लिटर प्रति दिवस या हिशोबाने पिण्याचे पाणी दिले जात आहे, मात्र पिण्याचे पाणी गुणवत्तापूर्ण असले पाहिजे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत उपाय योजना केल्या जात आहेत,ज्या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता खराब आढळून येईल तिथे योग्य कारवाई करून पिण्याचे पाणी शुद्ध करण्यात आवश्यक ते उपाय केले जाईल अशी माहिती योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे