नागपूर - अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या टी-1 नामक वाघाने (T1 Tiger Attack) महामार्गाच्या कडेला लघु शंकेसाठी थांबलेल्या पती-पत्नीवर हल्ला (T1 Tiger Attack on Couple) करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
वाघाच्या हल्ल्यात ते दोघेही थोडक्यात बचावले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या बचाव पथकाने जखमी वाघाचा शोध घेतला, त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून सुखरूप रेस्क्यू केले आहे. त्यानंतर जखमी टी-1 वाघाला उपचाराकरिता वन विभागाच्या ट्रांजिट ट्रीटमेंटमध्ये नेण्यात आले आहे.
- वाहनाच्या धडकेत वाघ जखमी -
नागपूर जिल्ह्यातील चोर बावली या ठिकाणी आज (25 जानेवारी) सकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मिस्ट्री टी-1 हा वाघ जखमी झाला. त्याच्या मागील डाव्या पायाला दुखापत झाली होती. वाघ जखमी अवस्थेत त्या ठिकाणी झुडपात लपून बसलेला होता. त्याचवेळी मिथिलेश तिवारी हे त्यांच्या पत्नी विमला तिवारी यांच्यासोबत पवनीकडून मनसरकडे जात होते. ते रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्याकरिता थांबले असताना लपून बसलेल्या वाघाने विमला तिवारी यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिथिलेश तिवारी यांच्यावरसुद्धा वाघाने हल्ला केला. या घटनेत विमला तिवारी यांच्या पायाला तर मिथिलेश तिवारी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. हल्ल्यात दोघेही थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- वाघाचे यशस्वी रेस्क्यू -