Flower crown world record : फुलांचे मुकुट बनवण्याचा स्वाती गादेवार यांनी रचला विश्वविक्रम - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड
जगात रोज कोणत्या - कोणत्या गोष्टीचे विक्रम रचले जातात. आता यामध्ये एका अनोख्या विक्रमाची भर पडली आहे. 108 फुलांचे मुकुट (tiaras) तयार करून हा विक्रम बनवला गेला आहे. या विक्रमाची एकाच दिवशी दिवशी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book of Records ) आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Records ) नोंद झाली आहे.
नागपूर : नागपुरातील प्रसिध्द फ्लोरल आर्टिस्ट ( Famous Floral Artist from Nagpur ) यांनी फुलांचे मुकुट बनवण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम केला आहे. नागपूरच्या स्वाती गादेवार यांनी सात तासात तब्बल 108 फुलांचे मुकुट(tiaras) तयार करून हा विक्रम बनवला आहे. यांसाठी 100 मुकुट बनवण्याचे उद्धिष्ट ठेवून 108 मुकुट हे 6 तास 56 मिनिटांत पूर्ण केले आहे. त्यांचे फुलांपासून बनवलेले दागिने हे पॅन इंडियास विक्रीस जातात. नव नवीन डिजाईन आणि कल्पकतेमुळे फुलांनी सजविलेल्या दागिन्यांना विशेष महत्त्व आले आहे. लहानपणी देवघरातील देवांसाठी फुलांचे हार बनवण्याची आवड होती. हीच आवड पुढे करियर बनली. त्याचबरोबर आता विश्वविक्रमावार नाव कोरण्याचे माध्यमही ठरले आहे.