नागपूर: माओवाद्यांसोबत संबंध (GN Saibaba Maoist Links) असल्याच्या आरोपात अटक झालेले दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक साईबाबाची न्यायालयाने निर्दोष सुटका (GN Saibaba Court Acquittal) केल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली (SC on GN Saibaba relief) आहे. यावर यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. (Deputy CM Fadnavis on GN Saibaba) (Deputy CM Fadnavis on Supreme Court Verdict)
GN Saibaba Case : साईबाबांविरोधात न्यायालयीन लढाई सुरूच राहील; मात्र...- देवेंद्र फडणवीस - Fadvanis On GN Saibaba case
दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक साईबाबाची न्यायालयाने निर्दोष सुटका (GN Saibaba Court Acquittal) केल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली (SC on GN Saibaba relief) आहे. यावर यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. (Deputy CM Fadnavis on GN Saibaba) (Deputy CM Fadnavis on Supreme Court Verdict)
नागपूर खंडपीठाचा निकाल आश्चर्यजनक -सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाच्या संदर्भात दिलेला निकालाला स्थगिती दिली आहे. मी काल देखील या संदर्भात बोललो होतो, की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्याकरिता आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता; कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे असताना त्या व्यक्तीला न्यायालयाने टेक्निकल मुद्द्यावर सोडण हे चुकीचं होतं, म्हणून कालच्या काल आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
फडवणीसांना मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार-सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार आहेत की, त्यांनी आमची बाजू तात्काळ ऐकून नागपूर खंडपीठाचा निर्णय सस्पेंड केला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आता पुढची कायदेशीर लढाई आम्ही लढू; पण आज किमान जे आमचे पोलीस नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा निर्णय हा निर्णय आहे, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.