महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलासा;'आरएसएस' नावाने संस्था नोंदणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ निकाल

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने संस्था नोंदणीची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे मूळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली होती.

supreme court denied petition as registration of RSS
आरएसएस नावाने संस्था नोंदणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By

Published : Dec 7, 2019, 11:49 AM IST

नागपूर - 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने संस्था नोंदणीची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे मूळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली होती.

सुनावणी दरम्यान न्यायालायाने संबंधित नावाने नोंदणी करण्याचा आग्रह का आहे? तसेच या नावाने नोंदणी करुन समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? अशी विचारणा करत ही याचिका फेटाळून लावली.

डॉ. केशव हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात स्थापना केली होती. परंतु, हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघाची अधिकृत नोंदणीच नसल्याने याचिकाकर्ते जनार्दन मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संस्थेला नोंदणी मिळण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला होता. धर्मदाय आयुक्तांनी 2017 च्या ऑक्टोबर महिन्यात मून यांची मागणी नाकारली. यानंतर मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. जानेवारी 2019 मध्ये उच्च न्यायालयाने देखील संबंधित याचिका फेटाळून लावली.
यानंतर मून यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details