नागपूर : मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाने ( Heavy Rains ) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात ( East Vidarbha ) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम हातचा ( Damage to Kharif Crops ) गेला आहे. त्यामुळे रब्बी पिकासाठी आतापासून नियोजन करण्याची मागणी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांनी ( Former minister Sunil Kedar ) केली आहे. ते नागपुरात काँग्रेस प्रदेश कमिटीच्या ( By Order of Congress Pradesh Committee ) आदेशावरून जिल्ह्यातील अनेक भागांत जाऊन पदाधिकरी यांच्यासोबत पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या परिस्थितीच्या आढावा घेतला.
अतिवृष्टीमुळे पुराने खरीप पिकांचे नुकसान : सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या एका विशेष समितीने नागपूर जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. या घेतलेल्या आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. तसेच, सरकारने निकष बाजूला ठेवून नैसर्गिक संकटात अधिकाधिक मदत देण्याची मागणी केली आहे. दोन दिवस चाललेल्या या दौऱ्यानंतर केदार यांनी नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामाची पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त ( Damage to Kharif Crops ) झाल्याचा दावा केला आहे. या पावसाच्या प्रकोपाने कापूस, सोयाबीन हे विदर्भातील पारंपरिक पीकच नाही, तर भाजीपाला पीकसुद्धा हातचे गेले. पुन्हा पेरणीयोग्य जमीन नाही, त्यामुळे खरीप गेला. आता रब्बीसाठी पाणी, खत, बियाणे यांचे नियोजन करण्याची गरज आहे.