नागपूर -शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम नगर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धीरज राणे आणि सुषमा राणे असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. या शिवाय त्यांची दोन मूले देखील मृतावस्थेत आढळून आली आहेत. कोराडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
धीरज राणे हे शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते. तर, त्यांची पत्नी नागपुरातील एका रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आज (मंगळवार) दुपारी राणे दाम्पत्याने दोन्ही मुलांसह आत्महत्या केली. सुषमा राणे यांनी गळफास घेतला होता. तर, धीरज राणे आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा ध्रुव, ५ वर्षीय मुलगी वाण्या यांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळून आले आहेत.