महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sudhir Mungantiwar  : महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंद, कासवालाही वाटेल आत्महत्या करावी : सुधीर मुनगंटीवार - Sudhir Mungantiwar on Amravati tour

अमरावती - आज महाराष्ट्रातला विकासाचा वेग ( Maharashtra Development Speed ) पाहिला तर कासवाला सुद्धा आत्महत्या करावीशी वाटेल, अशी परिस्थिती असल्याची टीका माजी मंत्री तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Sudhir Mungantiwar ) यांनी केली आहे. आज अमरावती दौऱ्यावर आलेल्या सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar on Amravati tour ) यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता राज्य शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

mungantiwar
mungantiwar

By

Published : Jun 19, 2022, 7:51 PM IST

अमरावती -आज महाराष्ट्रातला विकासाचा वेग ( Maharashtra Development Speed ) पाहिला तर कासवाला सुद्धा आत्महत्या करावीशी वाटेल, अशी परिस्थिती असल्याची टीका माजी मंत्री तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Sudhir Mungantiwar ) यांनी केली आहे. आज अमरावती दौऱ्यावर आलेल्या सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar on Amravati tour ) यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता राज्य शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारवर टीका

केंद्रावर टीका करणे हाच मुख्यमंत्र्यांचा अजेंडा -राज्यात अनेक अनेक प्रश्न गेल्या पावणेतीन वर्षात अतिशय गंभीर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून द्याव्यात असे मुख्यमंत्र्यांना कधी वाटले नाही. वीज दरही वाढले आहेत. मात्र, जनतेचे प्रश्न न सोडविता केवळ केंद्र सरकारवर टीका केल्यानेच महाराष्ट्र सुजलाम् होईल, असेच या सरकारला वाटते आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे निदान आजच्या दिवशी तरी त्यांना सद्बुद्धी मिळो, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आमदारांना विकाऊ म्हणजे ही गंभीर बाब -राज्यसभा निवडणुकीची नंतर अपक्ष आमदारांना विकाऊ म्हणून शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांचा अपमान केला आहे. जर कोणी आमदार गैरप्रकार करीत असेल अशी शंका सरकारला असेल तर राज्यात 21 हजार कोटी रुपयांच्या र्थसंकल्पाची तरतूद असणार्‍या पोलीस विभागाकडून अशा आमदारांची चौकशी करायला हवी. मात्र अशा लोकशाही मार्गाचा वापर न करता आमदारांवर अशी टीका करणे अतिशय गंभीर बाब असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. खरंतर 24 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्राचा जनादेश भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने असताना शिवसेनेने महाराष्ट्रासोबत गद्दारी केली. आता हे लोक इतरांना काय शिकवणार असा प्रश्न देखील सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

विधान परिषदेतही बाजी मारू -शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अपना अपना देखो असे विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. अपना अपना देखो म्हणजे आता सगळेच आमदार आपापल्या मतदानानेच या निवडणुकीत भाजपच्या पाचही सदस्यांना निवडून देतील असा ठाम विश्वास मला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजप नक्कीच बाजी मारणार. राज्यातील महा विकास आघाडीला आम्ही नक्कीच प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचा उमेदवार उभा करण्याची तयारी जोमाने सुरू करणार असून विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -Vidhan Parishad Elections 2022 : छोटे पक्ष व अपक्ष आमदारांची मत ठरणार निर्णायक!

ABOUT THE AUTHOR

...view details