नागपूर -आज (मंगळवारी) नागपूरच्या कडक ऊन असलेल्या वातावरणात अचानक बदल झाला आणि धो-धो करून पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या, ज्यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील सुटला होता. ज्यामुळे अनेकांची पंचाईत झाली.
अचानक आलेल्या पावसाने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना दिलासा
सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील सुटला होता. ज्यामुळे अनेकांची पंचाईत झाली.
नागपूर पाऊस
त्रस्त असलेल्यांना दिलासा
नागपुरात आज सकाळपासून कडक ऊन पडले होते. मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरवात झाली आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला. अचानक पाऊस आल्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही वेळांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली असल्याने वातावरणात सुखद बदल झालेला आहे.