महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

inspirational story of meera prajapati दृष्टिहीन मीरा प्रजापतींची डोळसं कहाणी, व्यवस्थित हाताळतात चहाचा व्यवसाय - even losing sight runs a tea business

नागपुरच्या मीरा प्रजापतींची वाटचाल ( inspirational story of meera prajapati) हि जीवंत असतानाही जगण्याची उमेद गमावलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी दृष्टी (blind Meera Prajapati) गमावूनसुध्दा त्या आज नागपुरात चहाचा यशस्वी (tea business) व्यवसाय चालवत आहेत. दिवसाला 200 कप चहाची विक्री त्या करतात. त्या पैशातुन मीरा यांचे घर चालते. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा डोळस दृष्टीकोन प्रेरणादायी आहे.

inspirational story of meera prajapati
दृष्टिहीन मीरा प्रजापतींची डोळसं कहाणी, दृष्टी गमावुनसुद्धा करतात चहाचा व्यवसाय

By

Published : Sep 13, 2022, 4:27 PM IST

Updated : Sep 13, 2022, 5:08 PM IST

नागपूरसुमारे 50 वर्षांपूर्वी मीरा प्रजापती (meera prajapati) यांचे कुटुंबीय राजस्थानच्या उदयपूर येथून नागपूरला स्थायिक झाले. ४२ वर्षांपूर्वी मीरा यांचा जन्म नागपूरला झाला. तीन वर्षांच्या असताना त्यांना व्यवस्थित दिसायचं. मात्र, हळूहळू त्यांची दृष्टी अधू होत गेली. कालांतराने त्यांची दृष्टी पूर्णपणे गेल्यानंतर देखील त्यांनी हिंमत हरली नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेता आलं नाही. मात्र, त्यांनी आईची मदत करत फक्कड चहा तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. कालांतराने त्यांच्या आई वृद्ध झाल्यानंतर आता मीरा अंदाजाने चहा तयार करतात. त्यांच्या हाताला चव असल्याने आज अनेक नागपुरकर आवर्जून त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी येत असतात.

सकारात्मक दृष्टीकोन संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. कुणाच्या वाट्याला कमी तर कुणाला अधिक संघर्ष करावाचं लागतो. संघर्ष केल्याशिवाय यश मिळतं नाही. सर्वांना अपवाद ठरल्या आहेत नागपूरच्या मीरा प्रजापती. दोन्ही डोळ्यांनी पूर्णतः अंधत्व आलेल्या मीरा यांनी कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी वृद्ध आई चालवत असलेल्या चहाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. आज त्या चहा बनवण्यात इतक्या पारंगत झाल्या आहेत, की दिवसाला दोनशे कप चहाची विक्री करतात. त्यातून मिळालेल्या पैशातून त्या वृद्ध आईच्या औषधांचा खर्च देखील भागवतात. मीरा प्रजापती यांना अंधत्व आले असले तरी एखाद्या डोळस व्यक्तीप्रमाणेचं त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे.

दृष्टिहीन मीरा प्रजापतींची डोळसं कहाणी, दृष्टी गमावुनसुद्धा करतात चहाचा व्यवसाय

मला सहानुभूतीची गरज नाही- मीरा प्रजापतीपरिस्थिती कितीही वाईट असली तरी मी कायम संघर्षचं करणारं. गेल्या ४२ वर्षांपासून माझा हा संघर्ष सुरू असून आता मला याची सवय झाली असल्याचं मत मीरा प्रजापती यांनी व्यक्त केलं आहे. मीरा प्रजापती यांचा वडिलोपार्जित चहाचा व्यवसाय आहे. सुमारे ५० वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय चहा विकत आहेत. नागपुरातील आंदोलनाचे केंद्र असलेल्या संविधान चौकात त्यांची कँटीन असल्याने रोज हजारो लोक त्यांच्याकडे चहा घेण्यासाठी येतात. दोन्ही डोळ्यांनी दिसत नसताना देखील मीरा प्रजापती अतिशय कुशलतेने चहाचं दुकान चालवत आहे. मला स्वकर्तुत्वाने जीवन जगायचे असून कुणाची दया मला नको असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. मला कुणाची सहानुभूती नको असदेखील मीरा म्हणतात.

Last Updated : Sep 13, 2022, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details