नागपूर -जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघाच्या खापरखेडा परिसरात भाजप उमेदवार राजीव पोतदार यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. घटनेनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
नागपूर : भाजप उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारंघाच्या खापरखेडा परिसरात भाजप उमेदवाराच्या राजीव पोतदार यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
सावनेर विधानसभा क्षेत्र अंतर्गत खापरखेडा जवळच्या सिलेवाडा येथे नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष आणि सावनेर मधून भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या गाडीवर दगड फेक झाली. डॉ. पोतदार हे सिल्लेवाडा येथील एका कार्यकर्त्याच्या घरून परत येत असताना काही अज्ञात लोकांनी डॉ. पोतदार यांच्या फॉरच्युनर कार वर दगड फेक केली.
भाजपचा आरोप आहे, की ही दगडफेक काँग्रेस कार्यकर्त्यानी केली आहे. या दगड फेकीत कुणीही जखमी झालेले नसून गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या मध्ये कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जखमी झालेला नाही. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी दगडफेकी केल्याची तक्रार खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.