अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू आहे. अशावेळी शहरातील मुस्लीम बहुल परिसरात रात्रीला बाहेर होणाऱ्या गर्दीला पांगविण्यासाठी चक्क एका वकिलाने दहशत निर्माण केली आहे. अरे घरी बसा, अशी विनंती करत तर काहींना हातातील काठीचा प्रसादही हे वकील साहेब देत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम होतो आहे.
सकारात्मक! अरे घरात बसा.. वकील साहेबांची मुस्लीम वस्तीत दहशत - नागपूर कोरोना न्यूज
शोएब खान असे या वकिलाचे नाव आहे.
amravati
शोएब खान असे या वकिलाचे नाव आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी असतानाही अनेकजण रात्रीच्या सुमारास एकत्र येत आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शोएब खान यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि फायदेशीर ठरताना दिसत आहे. शोएब खान यांच्या या उपक्रमाचा नागपुरी गेट पोलिसांवरचा ताण बऱ्यापैकी कमी झालेला आहे.