महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर शासकीय रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने फुल्ल; बेड अपुरे, व्हिडिओ व्हायरल..

नागपुरात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत चालली आहे. याच संदर्भातील मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयातील परिस्थिती दाखणाऱ्या परिस्थितीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने किती भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हेच या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. यामुळे जम्बो रुग्णालयाची माहिती पुढे येऊ लागली आहे.

Nagpur Government Hospital
Nagpur Government Hospital

By

Published : Apr 16, 2021, 8:15 PM IST

नागपूर -नागपुरात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत चालली आहे. याच संदर्भातील मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयातील परिस्थिती दाखणाऱ्या परिस्थितीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे रुग्णालयात बेड मिळत नसल्याने किती भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हेच या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. यामुळे जम्बो रुग्णालयाची माहिती पुढे येऊ लागली आहे.

यात ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शहरातील महागड्या खासगी रुग्णालयात उपचार मिळवत आहेत. पण सर्वसामान्य लोकांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. पण या परिस्थितीत शासकीय रुग्णालय खचाखच भरून गेले आहे. शासकीय रुग्णलयातून इतर आजारांच्या रुग्णांना परत पाठवले जात आहे. दुसरीकडे इतर आजाराचे उपचार घेण्यासाठी जात असणारे सुद्धा आता कोरोनाने बाधित होऊ लागले आहेत.

नागपूर शासकीय रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने फुल्ल
नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये तथा शासकीय रुग्णालयात नागपूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील रुग्ण येत आहे. महाराष्ट्रच्या सीमेवर इतर राज्यातून सुद्धा रुग्ण येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात येणारे रुग्ण हे बाधित किंवा ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आहेत. यामुळे रुग्ण पहिले कॅझुलटी विभागात ठेवले जात आहेत. कारण आगोदरच कोरोना वार्डात बेड फुल्ल झाले आहे. यात दिवसभरात कित्येक रुग्णवाहिका रुग्ण घेऊन येत असल्याने रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. वेळप्रसंगी एकाच बेडवर दोन रुग्ण झोपून ठेवावे लागत आहेत.हे चित्र काही एका दिवसाचे नसून हे चित्र रोज शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना इतर कारणांसाठी असो की अन्य जलद उपचार असो गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी शासकीय रुग्णालयात जाताना कोविड नियमांचे पालन केले नाही तर उपचार मिळणार नाही असेच चित्र सध्या नजरेस पडत आहे.यावर बोलताना नागपूर मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मात्र परिस्थिती अचानक रुग्णाची संख्या वाढल्यास बेडची व्यस्था होत नाही. तोपर्यंत त्यांना ऑक्सिजनची गरज असल्याने एकाच बेडवर ऑक्सिजन द्यावे लागत असले तरी ही परिस्थिती फक्त 10 ते 15 मिनिटांसाठीच होते.

ABOUT THE AUTHOR

...view details