महाराष्ट्र

maharashtra

नागपूर : रिझर्व बँकेच्या सुरक्षेसाठी तैनात एसआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

By

Published : Jul 28, 2019, 8:14 AM IST

ही घटना रात्री उशिरा घडली. सर्व सुरक्षारक्षक आपल्या कर्तव्यावर असताना अचानक रिझर्व बँक परिसरात बंदुकीतून गोळी चालल्याचा आवाज आला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर एसआरपीएफचे जवान प्रसन्ना मस्के यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले.

एसआरपीएफ जवान प्रसन्ना मस्के

नागपूर - रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रसन्ना मस्के असे या जवानाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ही घटना रात्री उशिरा घडली. सर्व सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्यावर असताना अचानक रिझर्व बँक परिसरात बंदुकीतून गोळी चालल्याचा आवाज आला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर एसआरपीएफचे जवान प्रसन्ना मस्के यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले. प्रसन्ना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रसन्ना मस्के एसआरपीएफच्या ग्रुप 4 चे जवान होते. घटनेची माहिती समजताच सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रसन्नाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रसन्नाने आत्महत्या केली, की हा घातपात होता, यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details