नागपूर -असाधारण बुद्धिमत्तेच्या जोरावर नागपुरातील 18 वर्षीय तरुणाने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे पीक वाचवण्यासाठी केलेले संशोधन ( Innovative research in agriculture Field) केवळ आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोगी सिद्ध झाले आहे. श्रीनभ अग्रवाल असे या युवा संशोधकाचे नाव आहे. कृषी पिकांवर यलो मोजेक नावाच्या व्हायरस येतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. शेतकऱ्यांचे पीक या व्हायरसपासून वाचवण्यासाठी श्रीनभ 16 वर्षांचा होता त्यावेळी त्याने हे संशोधन केले.
Award For Innovative research : नागपूरच्या युवा संशोधकाचे ध्येय.. भारताला मिळावे विज्ञान क्षेत्रातील नोबेल
नागपुरातील 18 वर्षीय तरुणाने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे पीक वाचवण्यासाठी केलेले ( Innovative research in agriculture Field) संशोधन केवळ आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोगी सिद्ध झाले आहे. श्रीनभ अग्रवाल असे या युवा संशोधकाचे नाव आहे. श्रीनभच्या कल्पकतेचा सन्मान करण्यासाठी त्याला (Srinabha Agarwal get National Children Award ) प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला होता. आज या पुरस्कारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात आले.
श्रीनभच्या कल्पकतेचा (Srinabha Agarwal get National Children Award ) सन्मान करण्यासाठी त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला होता. आज या पुरस्कारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात आले. श्रीनभला नाविन्यपूर्ण संशोधन (इनोव्हेशन) या श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीनभने 'ईटीव्ही भारत' सोबत खास बातचीत केली. त्यावेळी त्याने सांगितले की, त्याला भौतिकशास्त्र या विषयात देशाला नोबेल पारितोषिक मिळवून द्यायचे आहे आणि त्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.
सर्वात तरुण संशोधक ठरलेल्या श्रीनभ अग्रवाल याने दोन वर्षांपूर्वी एक मॉडेल तयार केले होते, ज्यामध्ये त्याने कमी पाणी उपयोगात आणून पीक कसे वाढवायचे यावर संशोधन केले आहे. श्रीनभने आपल्या नाविन्यपूर्ण युक्तीच्या जोरावर कृषी तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न केव्हाच सुरू केले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हा त्याचा उद्देश आहे.
मिशन 25 वर्ष -
राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पुढील 25 वर्षात आपल्या देशाला कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात जगाच्या पुढे नेण्याचे ध्येय आपल्या पुढे असल्याचे त्यांनी विद्यार्थाना सांगितले, तेव्हा या कार्यासाठी मी तयार असल्याचे श्रीनभ म्हणाला आहे