नागपूर - कोरोना विरुद्धच्या लढाईत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत शहरातील चौका-चौकात ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. एका ट्रक वर चालता-फिरता ऑर्केस्ट्रा तयार करून पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोरंजन केले जात आहे. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाल्याचे चित्र आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी ऑर्केस्ट्रा!
कोरोना विरुद्धच्या लढाईत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी 24 तास रस्त्यावर आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर मानसिक तणाव येत आहे. तो घालवण्यासाठी कलाकारांनी प्रशासनाच्या मदतीने पुढाकार घेतलाय. बंदोबस्त असणाऱ्या चौकांमध्ये हे कलाकार ऑर्केस्ट्रा सादर करून मनोरंजन करत आहेत. तर, काही ठिकाणी खुद्द पोलीस कर्मचारी यात सहभागी होऊन गाणी गात आहेत.
अगदी थोडे वाद्य कलाकार आणि गायक पोलीस ड्युटीवर असणाऱ्या ठिकाणी त्यांचे वाहन घेऊन जातात; आणि मनोरंजनसोबत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून त्यांना प्रेरणा देत आहेत.