महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Social Activist Murder : समाजसेवक सुनील जवादे यांची चार अल्पवयीन मुलांनी केली हत्या - Nagpur murder news

समाजसेवक सुनील जवादे ( Social activist Sunil Jawade ) यांना समाजात मान होता ते समता सैनिक दलाचे निमंत्रक देखील होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते भाजी विकण्याचा व्यवसाय करायचे. आज पहाटे ते घराबाहेर पडले असता आधीच तयारी असलेली चार अल्पवयीन आरोपींनी संगनमत करून त्यांना घेतले. काही काळण्याच्या पूर्वीच आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली, ज्यामुळे त्यांना आरोपींकडून होणारा वार दिसला नाही. चारही अल्पवयीन आरोपींनी धारधार शस्त्रांनी वार केले.

Social Activist Murder
समाजसेवक सुनील जवादे यांची हत्या

By

Published : Nov 25, 2021, 3:34 PM IST

Updated : Nov 25, 2021, 3:43 PM IST

नागपूर -समाजातील तरुणांनी आपले वर्तन चांगले ठेवावे याकरीता मार्गदर्शन करणारे समाजसेवक आणि समता सैनिक दलाचे निमंत्रक सुनील जवादे ( Social activist Sunil Jawade ) यांची निर्घृण हत्या झाली आहे. सुनील जवादे यांची हत्या चार अल्पवयीन मुलांनी केली आहे. आज पहाटे चार ते पाच वाजल्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांची प्रतिक्रिया

मिरची पूड डोळ्यात टाकून केले वार -

समाजसेवक सुनील जवादे यांना समाजात मान होता ते समता सैनिक दलाचे निमंत्रक देखील होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते भाजी विकण्याचा व्यवसाय करायचे. आज पहाटे ते घराबाहेर पडले असता आधीच तयारी असलेली चार अल्पवयीन आरोपींनी संगनमत करून त्यांना घेतले. काही काळण्याच्या पूर्वीच आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली, ज्यामुळे त्यांना आरोपींकडून होणारा वार दिसला नाही. चारही अल्पवयीन आरोपींनी धारधार शस्त्रांनी वार केले. यात सुनील जवादे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती समजताच इमामवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र तो पर्यंत सुनील जवादे यांचा मृत्यू झाला होता.

मुलांचे मार्गदर्शन करणे पडले महागात -

समाजसेवक सुनील जवादे हे शाळकरी मुलांना नेहमीच मार्गदर्शन करायचे. मात्र त्यांच्या या चांगल्या सवयीमुळे काही तरुण दुखावले होते, ज्यामुळे त्यांचा सुनील जवादे यांच्या सोबत वाद देखील झाला होता. त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी आज पहाटे चार अल्पवयीन आरोपींनी त्यांचा खून केला. इमामवाडा पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा -महिला अंघोळ करताना सुरक्षारक्षक काढत होता व्हिडिओ; अन् तेवढ्यात...

Last Updated : Nov 25, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details