नागपूर -लंम्पी हा आजार ( Lumpy disease ) जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून त्यावर उपाययोजना करताना ज्या ठिकाणी उद्रेक ( lumpy disease in Nagpur district ) झाला. त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वीस जनावरांना ( twenty animals infected with lumpy disease ) लागण झाली. त्यापैकी एका बैलाचा मृत्यू ( bull died of lump disease ) झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.जिल्ह्यात दहा हजार जनावरांचे लसीकरणाचे उद्दिष्ट घेतले असून आतापर्यंत 4 हजार लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
गुरांना चर्मरोगचा दृश्य लक्षणे -नागपूर जिल्ह्यातील ( lumpy disease in Nagpur ) सावनेर तालुक्यातील बडेगाव, उमरी, जांभळा पाणी तसेच हिंगणा तालुक्यातील जुनेवाणी येथील गुरांना चर्मरोगचा दृश्य लक्षणे ( infected with lumpy disease ) आतापर्यंत दिसून आली आहेत. ही संख्या वीस आहे. बडेगाव येथील बैल सदृश्य आजारामुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या आजारावर इलाज असून 100% यातून जनावरे बरी होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र लक्षणे दिसताच लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी,असे आवाहन त्यांनी आज येथे केले.
यंत्रणा सज्ज -नागपूर जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी आणि संलग्न मनुष्यबळ या आणीबाणीच्या परिस्थितीत ज्या ठिकाणी उद्रेक आहे. त्या ठिकाणी एकत्रितपणे काम सुरू केले असून या साथ रोगाचा बिमोड करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती दिली.
मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध -राज्य शासनामार्फत मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लंम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य घातक प्रकारचा रोग आहे. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुपालक शेतकरी, शासनाची विविध विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत.