नागपूर - वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी भाजपच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मांचे समर्थन केल्यामुळे शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. लॉरेन्स ग्रेगरी असे धमकी मिळालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. नागपूर शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत. एका निनावी पत्राच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं shivsena worker threat after support nupur sharma post आहे.
लॉरेन्स ग्रेगरी यांनी ९ ऑगस्ट रोजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यसंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यात लॉरेन्सने नुपूर शर्मा प्रकरणानंतर राजस्थानच्या उदयपूर येथे झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडाचा उल्लेख केला होता. त्यानंतर अज्ञात आरोपीने लॉरेन्स ग्रेगरीच्या घरात दगडावर गुंडाळलेला एक धमकीचा पत्र फेकले आहे.
पोलिसांनी पुरवली सुरक्षा -धमकी पत्रामुळे लॉरेन्स ग्रेगरी आणि त्यांचे कुटुंबीय दहशतीत आले आहे. त्यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, लॉरेन्स ग्रेगरीला सुरक्षा पुरवली आहे.
काय आहे पत्रात? -लॉरेन्स ग्रेगरी यांनी ९ ऑगस्ट रोजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यसंदर्भात फेसबुक वर पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्यांनी कन्हैयालाल हत्याकांडाचा ही उल्लेख केला होता. त्यानंतर 12 ऑगस्टच्या पहाटे अज्ञात आरोपीने लॉरेन्स ग्रेगरीच्या घरात दगडावर गुंडाळलेला एक धमकीचा पत्र फेकले आहे. त्यात लाल रंगाने लिहून लॉरेन्स यांना "अब तेरी भी गर्दन उतारी जायेगी", अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
हेही वाचा -Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती