महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on Navneet Rana : सरकारमध्ये असल्याने हात बांधलेले अन्यथा.. - शिवसेना नेते संजय राऊत

भारतीय जनता पक्ष बायकांना समोर करून श्रीखंडीचे उद्योग करत आहे, हे हिजडेगिरी बंद करा, असा हल्ला शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut on Rana family ) यांनी भाजपवर केला. ते नागपुरात ( Sanjay Raut News Nagpur ) माध्यमांशी बोलत होते. कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्त बसतील काय? असे संजय राऊत ( Sanjay Raut comment on Navneet Rana ) म्हणाले.

Sanjay Raut on Rana family
नवनीत राणा टीका संजय राऊत

By

Published : Apr 23, 2022, 11:42 AM IST

Updated : Apr 23, 2022, 12:25 PM IST

नागपूर - भारतीय जनता पक्ष बायकांना समोर करून श्रीखंडीचे उद्योग करत आहे, हे हिजडेगिरी बंद करा, असा हल्ला शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut on Rana family ) यांनी भाजपवर केला. ते नागपुरात ( Sanjay Raut News Nagpur ) माध्यमांशी बोलत होते. कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्त बसतील काय? असे म्हणत आमच्या घरात घुसाल तर तुम्हालाही घर आहे, हे विसरू नका, असा इशारा संजय राऊत ( Sanjay Raut News on Navneet Rana ) यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा -Navneet Rana ON Disput : शिवसैनिक आमच्या घरावर हल्ला करत आहेत, पण मी 'मातोश्री'वर जाणारच - नवनित राणा

राणा ( Navneet Rana Matoshree visit Determination ) दाम्पत्याला आम्ही मोठे करण्याचे काम करत नाही. तर, कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणाऱ्या बंटी बबलीला मोठे करण्याचे काम नव हिंदुत्ववादी ओबीसी लोक करत आहेत. सरकारने काय करावे याचे सल्ले मुख्यमंत्र्यांनी ऐकूण घेण्यासाठी महाराष्ट्राला भिकारीपण अजून आलेले नाही. तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या लायकीप्रमाणे राहा. लक्ष्मणरेषा ओलांडली तर शिवसैनिकसुद्धा संतापून तुमच्या घरापर्यंत येणार, हे लक्षात ठेवा, असा सल्ला राऊत यांनी दिला.

आम्हाला राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका -आम्हाला राष्ट्रपती राजवट लावण्याच्या धमक्या देऊ नका, लावायची असेल तर लावा. हिम्मत असेल तर राष्ट्रपती राजवट लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. मुंबईती मागील दोन दिवसांतील घटना पाहता फक्त शिवसैनिक यांच्या भावनेचा उद्रेक नाही तर जनतेच्या भावनांचा स्फोट पाहायला मिळत आहे.

शिवसैनिक मारायला आणि मरायला तयार -केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार आहे. आम्ही सरकारमध्ये असल्याने हात बांधलेले नक्कीच आहेत, असेही राऊत म्हणालेत. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हालाही घर आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

सत्ता आमच्यासाठी जन्माला आली, आम्ही सत्तेसाठी नाही -फडणवीस यांनी सरकार स्पॉन्सर्ड आहे अशी टीका केली. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, केंद्र सरकार स्पॉन्सर्ड आहे. केंद्रीय पोलीस स्पॉन्सर्ड आहे. शिवसैनिकांनी त्या झुंडशाहीला शिवसेनेच्या झुंडशाही पद्धतीने उत्तर दिले तर तुम्हाला मिरच्या का झोंबल्या, असेही राऊत म्हणालेत. शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाही. राष्ट्रपती राजवट लावायचे असेल तर लावा. आत्ताच मुख्यमंत्र्याशी बोलणे झाले. सत्तेची परवा आम्हाला नाही. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. तर, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आहे, हीच शिवसेनेची ताकद आहे.

केरळमध्ये पुरून उरलो, महाराष्ट्रातही पुरून उरणार, यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात पुरून उरण्यासाठी भाजपला सात जन्म घ्यावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांना पुरून उरल्या आहेत. भष्ट्राचारावर बोलत राहू, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा -Shiv Sena leader Vinayak Raut : तुम्ही कधीही या, 15 तासांनी जरी आले तरी आम्ही इथेच आहोत - विनायक राऊत

Last Updated : Apr 23, 2022, 12:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details