महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आरे'मधील झाडे तोडणारा अधिकारी 'गुणवंत'; महापौरांची घोषणा - aarey colony news

आरे कॉलनीतील झाडे तोडण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला गुणवंत अधिकारी म्हणून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. यामुळे शिवसेना आरे प्रकरण विसरले की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

mumbai municipal corporation news
आरे कॉलनीतील झाडे तोडण्याची परवानगी देणाऱया अधिकाऱ्याला गुणवंत अधिकारी म्हणून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे.

By

Published : Jan 27, 2020, 9:49 AM IST

मुंबई - आरे कॉलनीतील झाडे तोडण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला गुणवंत अधिकारी म्हणून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. यामुळे शिवसेना आरे प्रकरण विसरले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरे कॉलनीतील झाडे तोडण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार

मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कारशेड आरे कॉलनीत उभारण्यात येणार होते. त्यासाठी एमएमआरडीएने 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेच्या उद्यान आणि वृक्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठवला होता. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध असल्याने हा प्रस्ताव दोन वर्षे मंजूर करण्यात आला नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वृक्ष प्राधिकरण समितीने हा प्रस्ताव मंजूर केला.

हजारो झाडांची कत्तल थांबवण्यासाठी काही संघटना उच्च न्यायालयात गेल्या. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उद्यान आणि वृक्ष अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला झाडे कापण्याची परवानगी दिली. एका रात्रीत हजारो झाडे कापण्यात आल्याने याचे पडसाद सर्वत्र उमटले. यानंतर आमचे सरकार आले, तर आरेमधील मेट्रोचे काम बंद करू, असे वचन शिवसेनेकडून देण्यात आले.

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेमधील कामाला स्थगिती दिली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेत पालिकेतील उत्कृष्ट नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली. यानुसार नावांची घोषणा झाली. यामध्ये गुणवंत अधिकारी म्हणून उद्यान व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांचे नाव आहे. यामुळे आरेमधील झाडे तोडण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्याला बाळासाहेब ठाकरे पुरस्कार दिला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत.

महापौरांनी घोषित केलेली नावे -

सन 2018-19 चा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार नऊ जणांना जाहीर झाला आहे. यामध्ये एक प्रभाग समिती अध्यक्ष, दोन सहाय्यक आयुक्त, एक पालिका अधिकारी व सहा कामगारांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट गुणवंत अधिकारी म्हणून उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून परिचारिका पूजा नाणोसकर, बाजार निरीक्षणचे धर्मा कन्हीराम राठोड, नायर रुग्णालयाचे मुख्य लिपीक नरेश अनंत नाईक, तर उत्कृष्ट कामगार म्हणून देवनार पशुवैध गृहाचे अशोक पांडुरंग ससाणे, रोड रोलर स्वच्छक मुल्लाजी रफिक अब्दुल कादिर तर नायर रुग्णालयाचे हमाल प्रवीण परशुराम आडिवरेकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. रोख रककम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुढील महिन्यात पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details