नागपूर : नागपूर महाल परिसरात 349 वाछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्रोच्चार करून दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वस्त्र परिधान करीत माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून "जय भवानी, जय शिवाजीचा" जयघोषकरण्यात आला. डोळ्यांचे पारणे फेडणारे हा शिवराज्याभिषेक सोहळ्याला पाहण्यासाठी महाल परिसरात शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.
Shivrajyabhishek Ceremony in Excitement : नागपूर येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा दणक्यात साजरा करण्यात आला - जय भवानी जय शिवाजीचा जयघोष
नागपुर महाल परिसरात (In The Nagpur Mahal Area) 349 वा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Coronation Ceremony of Shivaji Maharaj) तिथीनुसार दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्रोच्चार करून दुग्धाभिषेक (Anointing) करण्यात आला. त्यानंतर वस्त्र परिधान करीत माल्यार्पण करण्यात आले. सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.
सोहळा दणक्यात साजरा : हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर वाहतूककोंडी होऊ नये याची काळजी घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेनं येणाऱ्या चारही मार्गांना सकाळी बंद ठेवण्यात आले होते.
या सोहळ्यात राज घराण्यातील मुधोजी राजे भोसले आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य आणि महिला यावेळी उपस्थित होत्या. शेकडो युवकांनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती.
हेही वाचा : LIVE : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा