नागपूर- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माण करण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर यावर राजकारण सुरू झाले आहे. पुलाच्या कामात दिरंगाई होत असताना आता पुलाच्या गुणवत्तेच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 19) कळमना परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचा काही भाग खाली कोसळला होता. त्या ठिकाणीच शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले आहे.
पूर्व नागपूरच्या भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी या ठिकाणी उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असताना मंगळवारी (दि. 19) रात्री पुलाचा एक भाग कोसळल्या अपघात झाला. लोड बेरिंग सिस्टीम फेल झाल्याने दोन पिलरच्यामध्ये असलेले गर्डर खाली कोसळले. सुदैवाने त्यावेळी घटनास्थळी काम बंद होते आणि जड वाहनांची वाहतूकही सुरू झाली नसल्याने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.