नागपूर - राज्य सरकारने शिक्षण विभागाचा 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय रद्द केला. त्यावरून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने पालक वर्गामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची टीका विरोधकांनी केली. मात्र, शाळा सुरू न करण्याच्या निर्णय हा मुलांच्या काळजीपोटी घेतला आहे. कोरोना संबंधित टास्कफोर्सने लहान मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने संसर्गाचा धोका ओळखून शाळा सुरू करण्यास हरकत दर्शली होती. शाळा सुरू झाला असत्या आम्हाला आनंद झाला असता. पण कोरोनाच्या डेल्टा सारख्या व्हेरिएंटचा लहान मुलांना धोका पाहता शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. त्या नागपुरात आढावा बैठकीनंतर बचत भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी आमदार मनिषा कायंदे, आणि जिल्हाधिकारी विमला आर या उपस्थित होत्या.
राज्यसरकारने काळजीपोटी शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संभ्याव तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राज्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी टास्कफोर्सने कोरोनाचा धोका असल्याने शाळा सुरू करणे लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल असे सूचित केले. यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यसरकारने शाळा सुरू न करण्याच्या निर्णयासंदर्भात पालकांशी चर्चा केली आहे. ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग देखील उपलब्ध आहे. अनेक शिक्षक ऑनलाइन पद्धतीने चांगले काम करत आहेत. यात काही अडचणी विद्यार्थ्यांना आहेत, त्यांना गॅझेट उपलब्ध करून द्यावे लागतील. पण काही लोक राणाभिमदेवी थाटात म्हणत आहेत की शाळा सुरू करून टाका. पण लहान मुलांना बाधा झाली तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही गोऱ्हे यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहे यामुळे योग्य विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने लांबणीवर टाकला असल्याचेही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
मंदिरे बंदचा आरोप केवळ महाराष्ट्रात का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मंदिर उघडण्याला परवानगी दिलेली नाही. मात्र, मदिरा खुली आणि मंदिरे मात्र बंद, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, यावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, हा फक्त एका पक्षाचा आरोप आहे. मात्र, उत्तरप्रदेश आणि गोव्यात का मंदिरे बंद आहेत? हे त्या सरकारांनाही विचारा, का त्याच्याबाबत गांधारी सारखी डोळ्याला पट्टी बांधली आहे, हे कळत नाही. सर्वत्र मंदिरे बंद असतांना महाराष्ट्रातच हा आरोप का? तसेच सरकारची देखील इच्छा आहे मंदिरे खुली झाली पाहिजेत मध्यंतरी मंदिरे खुली देखील कऱण्यात आली होतीच, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार विचारपूर्वक पाऊले टाकत असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली.
संवादाचा अभाव असल्यामुळे गोंधळ होतोय-
मुलांना कोरोनाचा धोका नको म्हणून सरकारने शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला - नीलम गोऱ्हे - शिक्षण विभागाच्या निर्णयाला स्थगिती
कोरोना संबंधित टास्कफोर्सने लहान मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने संसर्गाचा धोका ओळखून शाळा सुरू करण्यास हरकत दर्शली होती. शाळा सुरू झाला असत्या तर आम्हाला आनंद झाला असता. पण कोरोनाच्या डेल्टा सारख्या व्हेरिएंटचा लहान मुलांना धोका पाहता शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
लोकसभेत साधारण सभागृहात काय चर्चा होणार यासाठी सभागृह सुरू होण्यापूर्वी गटनेत्यांची बैठक सभागृहाचे अध्यक्ष सभापती यांच्याकडून बोलवली जाते. या माध्यमातून संभाव्य गोंधळ टाळला जात असतो. पण ज्यापद्धतीने संवादाचा अभाव आहे. त्यामुळे हा गदारोळाचा प्रकार घडत आहे. यात महिला सभापती म्हणून एक अनुभवातून सांगते की महिला सभागृहात शिस्तबद्ध असतात, महिलांनी राजदंड पळवल्याचे फार ऐकिवास नसल्याचेही उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
विदर्भात अधिवेशन नाही झाले म्हणून चर्चा नाही असे नाही...
विदर्भात अधिवेशन झाले नाही म्हणून विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, असे नाही. उलट विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विदर्भाचे असल्याचे विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा होते. आता डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असले तरी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. गेल्या पावसाळ्यात जुलैमध्ये अधिवेशन नागपुरात घेऊन पाहिले, पण मुंबईचा अनुभव आला असल्याचेही ते म्हणाल्या.
गटारीमुळे कुठे बसावे याचे भान राहिले नसेल...!
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांची चौकशी होणार असून राज्यमंत्री दत्त भरणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यात नागपुरातही अश्या बाबी उघडकीस आल्या आहेत. यात गटारीमूळे कुठे बसावे याचे भान राहिले नसेल पण याचे भान ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कोरोनाचे संकट महायुध्दासारखे
यात कोरोनाचे संकट माहायुध्द सारखे आहे. तशीच काहीशी परिस्थिती कोरोनामुळे उदभवली असून अनेक कुटुंब उध्वस्त झाले. 795 महिला विधवा झाल्यात 1750 बालकांचे मातृपितृ छत्र हरवले. जिल्ह्यात कोरोनाच्या काळात 63 गाव कोरोनामुक्त राहिले. यात प्रशासनाने चांगले काम केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. महायुद्धानंतर तेच परिणाम पुढील काही वर्षे यात काही कुटुंबाच्या अनुभवत येईल..