नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेत टीका ( Offensive statement about Prime Minister Modi ) केल्याप्रकरणी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांच्या विरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अखेर आज गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या मागणी नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज शेख हुसेन यांची प्रतिक्रिया देखील आली आहे. मी माझ्या भाषणात एका म्हणीचा वापर केला, त्यात चुकीचे काहीही नव्हते, उलट आंदोलनात आलेल्या लोकांनी माझ्या भाषणाचे कौतुक केले आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी कोणतीही चूक केलेली नसून मी माफी मागण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हेतुपरस्पर माझ्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण -नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांच्यावर अखेर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होते. त्यावेळी नागपूरच्या ईडी कार्यालयाबाहेर सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी बोलताना शेख हुसैन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसने नेते शेख हुसैन विरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अखेर नागपूर पोलिसांनी शेख हुसैन विरोधार गुन्हा दाखल केला आहे.
शेख हुसेनची जीभ घसरली -13 जूनला काँग्रेसच्या वतीने नागपूर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. त्यावेळी मोदी सरकार विरोधात भाषणे झाले. पण याच दरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते आक्षेपार्ह बोलून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की... असे ते बोलून गेलेत. या विधनासाठी एखादा नोटीसही येईल, पण त्याची मला काही परवा नाही, असेही शेख हुसेन यावेळी आक्रमक भाषण देण्याच्या ओघात बोलून गेले होते.