नागपूर- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होईल आणि ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. हे सरकार पाच वर्षे चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
सरकार आम्हीच स्थापन करणार, अन्.. ५ वर्षे चालवण्यासाठी प्रयत्नही करणार - शरद पवार - Nationalist Congress News
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. या वेळी घेतलेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी सत्ता स्थापने बाबत भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. येथील शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील नागपूर आणि परिसरातील काही ठिकाणी शेतीच्या नुकसानीची पाहाणी केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राज्यातील राजकीय स्थितीवर पवारांनी प्रथमच निसंदिग्ध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वात सरकार येईल आणि ते पाच वर्षे टिकेल, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
Last Updated : Nov 15, 2019, 1:48 PM IST