महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar : भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली असं आजही वाटत नाही - शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

Sharad Pawar: भटके विमुक्त जमाती संघटनांनी ५० वर्षे कष्ट केले आहेत. एक काळ असा होता की, भटके विमुक्त समाज गुन्हेगारी समाज आहे. असा उल्लेख केला जात होता. १९५२ साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांनी व्यक्त केले आहे. ते भटके विमुक्त संघटने तर्फे आयोजित अधिवेशनात बोलत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar

By

Published : Oct 8, 2022, 9:30 PM IST

नागपूर भटके विमुक्त जमाती संघटनांनी ५० वर्षे कष्ट केले आहेत. एक काळ असा होता की, भटके विमुक्त समाज गुन्हेगारी समाज आहे. असा उल्लेख केला जात होता. १९५२ साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांनी व्यक्त केले आहे. ते भटके विमुक्त संघटने तर्फे आयोजित अधिवेशनात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

भटक्या समाजाचे प्रश्न इतक्या वर्षांनी अजूनही कायम आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी समाजानं एकसंघ होण्याशिवाय पर्याय नाही. या अन्याय अत्याचाराचा विरोधात एकत्र येत मशाली पेटवण्याचा निर्धार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासुन मुक्ती झाली असं आजंही वाटत नाही. याकरिता एक शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल. भटक्यांचे विमुक्त समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय आता पर्याय नसल्याचं शरद पवारांनी नमूद केले आहे.

अन्याय विरोधात मशाल पेटवली पाहिजेसंघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे असे आवाहन NCP President Sharad Pawar त्यांनी यावेळी केले आहे.

जनता राजा म्हणून केला सन्मानलोकशाही समाजवादाची राखण करणारा जानता राजा म्हणून, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भटके विमुक्त संघटने तर्फे सन्मान करण्यात आला. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शरद पवारांनी नेतृत्व करावे, वामन मेश्रामदेशात संविधान विरोधी वातावरण निर्माण केले जात आहे. राजकारणात दीर्घकाळ अनुभव असलेले नेते शरद पवार यांनी देशात परिवर्तन घडवण्यासाठी नेतृत्व स्वीकारून काम केले पाहिजे. त्यांची क्षमता असून आम्ही त्यांना भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे देशभरातील ३१ राज्यात असलेले संघटनेचे बळ देण्यासाठी तयार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details