नागपूर- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन, अशा घोषणा दिल्या होत्या. निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस परत येताना दिसत नसल्याने शरद पवार यांनी याच घोषणेवरून फडणवीसांना टोला हाणला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी - शरद पवार नागपूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी विरोधकांवर टीका करताना अनेक घोषणा दिल्या होत्या. त्यापैकी एक घोषणा म्हणजे मी परत येईन....या घोषणेवरून भाजपने संपूर्ण प्रचाराची दिशा ठरवली होती. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील परिस्थिती बदलली आहे.
हेही वाचा -काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी विरोधकांवर टीका करताना अनेक घोषणा दिल्या होत्या. त्यापैकी एक घोषणा म्हणजे मी परत येईन....या घोषणेवरून भाजपने संपूर्ण प्रचाराची दिशा ठरवली होती. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून परत येताना कुठेच दिसत नाहीत. फडणवीस जेव्हा मी परत येईन, असे म्हणत होते तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की त्यांना ज्योतिषशास्त्र सुद्धा समजल्याचे सांगून फडणवीस यांना चिमटे काढले.