नागपूर - महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना रोखण्यासाठी राज्यात शक्ती कायदा आणला जात आहे. यात शक्ती कायद्याच्या विधीमंडळ समितीची पहिली बैठक आज नागपुरात निमंत्रीत महिला व वकिल संघटनासोबत घेण्यात आली.
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे आणि गतीने कारवाई व्हावी यासाठी कायद्यात महिला तसेच वकील आणि सामान्य नागरिकांकडून सूचना मागवण्यात येत आहे. प्रस्तावीत शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रीत महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधीमंडळ समितीच्या बैठक घेण्यात आली. या समितीची ही पहिली बैठक विधान भवनात निमंत्रीत महिला व वकिल संघटनासोबत चर्चा करण्यात आली.
या महिन्यात होणार तीन बैठका -
मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. यासाठी महिला संघटना व वकील संघटना या निमंत्रित केले जात आहे. पहिली बैठक 11 जानेवारीला नागपुरमध्ये विधान भवन येथे झाली. येत्या १९ जानेवारी मुंबई येथे तर २९ जानेवारीला औरंगाबाद येथे या बैठका होणार आहे. यात दोन टप्प्यात बैठक घेतली जात आहे. यावेळी मत हे लेखी स्वरूपात सुद्धा आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता निमंत्रीत महिला संघटनाची बैठक घेतली जात आहे. सायं. ५ वाजता वकिल संघटना बोलावून त्यावर चर्चा केली जात आहे. यासोबत सामान्य नागरिकांचा सुद्धा सूचना मागवल्या असून तसे आवाहन सुद्धा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जॉईंट समितीच्या माध्यमातून पुढील अधिवेशनात मांडून कायदा लवकरच आणू असे ते म्हणाले.