नागपूर -सेवांकुरच्या माध्यमातून नागपुरात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांसह कोरोना बाधित रुग्णांना मोठी मदत करण्यात आली. त्यानंतर आता सेवांकुरने ऑक्सिजन बँकेचा उपक्रम सुरू केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात 50 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची भर पडली आहे. कोरोना काळात या ऑक्सिजन बँकेचा रुग्णसेवेत मोठी मदत होणार आहे. सेवांकुरच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हजार लोकांना आरोग्यविषयक मदत पोहोचवण्यात आली आहे.
सेवांकुरची ऑक्सिजन बँक सुरू; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन - ऑक्सिजन बँकेची सुरुवात
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन 200 बेडचे हॉस्पिटल तयार करण्याच्या सूचना यावेळी फडणवीस यांनी प्रशानसनाला दिल्या आहेत. यात जे काही मदत ऑक्सिजन मशिनरी लागतील ते सर्व कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत. लवकरच एका रुग्णालयासाठी जागेची निवड केली जाणार आहे. यासोबतच लहान मुलांसोबत आईवडील किंवा कोणीतरी राहण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, कोरोनाच्या काळात सेवांकुरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. तसेच संस्थने मदतीबरोबरच समुपदेशनाचे कामही केले आहे. आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन बँकेच्या उपक्रमातून गरीब रुग्णांना मदत होईल ज्यांना रुग्णलायत जायची गरज नाही पण ऑक्सिजनची गरज आहे. या रुग्णांना कॉन्स्ट्रेटरचा वापर करून घरातच उपचार घेता येतील. यावेळी आमदार प्रवीण दटके, माजी माहापौर संदीप जोशी, आरएसएसचे विदर्भ प्रांतचे सरकार्यवाहक अतुल मोघे, यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.